समर्थ रामदास स्वामी हे छ. शिवरायांच्या भोसले घराण्याचे गुरु असल्याचे काही पुरावे -
१) महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे यांच्या पदरी तारो गोपाळ नावाचा कारकून
होता. त्याला आज्ञा करून राजेंनी समर्थांच्या अनेक ग्रंथांच्या प्रती शके
१५९६ ते १६०६ या दरम्यान तयार करून घेतल्या (या प्रती आजही तंजावर येथील
सरस्वती महाल ग्रंथालयात आहेत) त्यापैकी दासबोधाची प्रत कल्याण स्वामी
यांचे लहान बंधू दत्तात्रेय स्वामी यांनी लिहिलेल्या व ग्वाल्हेर येथील
प्रतींशी तंतोतंत जुळते.
२) भोसले घराण्याचे सध्याचे जे वंशज तंजावर येथे राहतात त्यांच्या नित्यपुजेत दासबोध हा ग्रंथ असून तो सोनेरी शाईने लिहिलेला आहे.
३) शिवरायांच्या वंशजांपैकी नागपूरचे वंशज हे देखील समर्थ भक्त आहेत आणि
त्यांच्या देवघरात समर्थ रामदासांची पंचधातूंची मूर्ती पहावयास मिळते.
४) सातारा गादीचे वंशज देखील दर वर्षी न चुकता गुरुगादी म्हणून सज्जनगडावरील समर्थ मठास भेट देतात व समर्थांपुढे नतमस्तक होतात.
५) ज्यावेळी भारतावर इंग्रजांचे राज्य आले तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातील
सर्व गड-कोट पडण्यास सुरुवात केली...याबाबत त्यांनी तत्कालीन छत्रपती श्री
प्रतापसिंह महाराज (छ. शाहू महाराजांचे वडील) यांना कळविले. याचा छत्रपती
प्रतापसिंहांच्या उत्तर पेशवाईतील एका रोजनिशीमध्ये उल्लेख असा आहे की
“इंग्रजांनी रंगो बापु करवी गड-कोट पाडण्यासंबंधी विचारले असता राजे
म्हणाले – ...….२ गडांना तसवीस देऊ नये, १ प्रतापगड आमच्या भवानीदेवीचा व १
गड परळी (सज्जनगड) आमच्या गुरूचा ….” (नोंद-यावेळी इंग्रजांनी बहुतांश
राज्य गिळंकृत केले होते)
यावरून हेच सिद्ध होते कि छ. प्रतापसिंह महाराज सुद्धा समर्थांना भोसले घराण्याचे गुरु मानत होते.
६) "छत्रपती शिवाजी" या काशिनाथ गोविंद जोगळेकर यांनी हिंदीतून लिहिलेल्या
ग्रंथात एक उल्लेख आहे कि शिवाजी महाराज हे संत तुकाराम आणि संत रामदास
यांचे भक्त होते. (पान क्र. २- भूमिका)
७) समर्थांनी महाराजांना दिलेला संदेश आहे - "मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा".
८) खुद्द छत्रपतींनीच समर्थांना सज्जनगड मुक्कामास देवू केला होता.
स्वराज्यासाठी मिळवलेला एखादा किल्ला महाराज असाच कुणालातरी देतील हे होणे
शक्यच नाही.
९) शंभू राजांना महाराजांनी आत्मशांतीसाठी सज्जनगडला
समर्थ अनुग्रहासाठी पाठवले होते. बाबा याकूत किंवा कोणी अजून एखादे साधुसंत
यांच्याकडे नाही. (जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचे काही वर्षे अगोदर
निधन झाले होते.)
१०) राज्याभिषेकाच्या वेळी समर्थ प्रदीर्घ काळ
उत्तर भारतात गेले असल्या कारणाने कल्याणस्वामी राज्याभिषेकाला उपस्थित
असल्याची नोंद आहे.
११) दक्षिण दिग्विजय आटोपून महाराज परत
आल्यानंतर ते सर्वप्रथम समर्थांची भेट घेण्यास सज्जनगडावर गेले व नंतर
प्रतापगडावर भवानी देवीचे दर्शन घेण्यास गेले. याच भेटीत महाराजांना
समर्थांनी दासबोधाची एक प्रत दिली.
१२) खुद्द तुकाराम महाराजांनीच
छत्रपतींना समर्थांना गुरु करण्याचा उपदेश केला होता. याबाबत त्यांचे
उपदेशपर आणि समर्थांचे वर्णन करणारे अभंग प्रसिद्ध आहेत.
१३)
शिवरायांवर ज्यांनी ज्यांनी काव्य केले त्यात तुकाराम महाराज आणि समर्थ
यांचेच नाव सर्वात पुढे आहे. बाकीचे जे आहेत ते इतिहासकार आहेत.
१४) तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर शिवरायांना धर्मोपदेश करणारे
फक्त रामदास स्वामीच असू शकतात कारण इतर कोणी सिद्ध पुरुष त्या काळात
अस्तित्वात असल्याची जास्त माहिती नाही. ज्या काही लोकांची माहिती आहे ते
बहुतेक सर्वच मुस्लीम आहेत. त्यामुळे महाराज समर्थांना सोडतील आणि मुस्लीम
संतांकडून अनुग्रह घेतील हे कसेकाय होवू शकते...???
१५) प्रबोधनकार ठाकरेंनी समर्थांच्या वर जो ग्रंथ लिहिला त्यात त्यांनी समर्थांना शिवरायांचे गुरु असे दाखविले आहे.
१६) जोतीराव फुलेंनी महाराजांवर जो पोवाडा केला त्यात सुद्धा त्यांनी समर्थांना शिवरायांचे गुरु असे दाखविले आहे.
१७) स्वराज्य आणि महाराज यांच्यावर कोणतेही संकट आले असता समर्थ त्यांना
उपदेशपर पत्र अथवा संदेश अथवा संकटातून तरण्यासाठी, धीर देण्यासाठी एखादे
काव्य करून पाठवतात. या गोष्टी फक्त एखादा गुरूच करू शकतो, कोणता बाबा
किंवा मौलवी नाही.
लेखन संदर्भ -
१) समर्थ व महाराज यांचा अन्योन्य संबध (भास्कर वामन भट - शके १८५०).
२) छ शिवाजी महाराज आणि दासबोध (www.dasbodh.com).
३) सभासद बखर.
४) ब्लॉग - इतिहासकाळात डोकावताना.
५) Other books from (www.dasbodh.com).
ज्या लोकांना खरोखर इतिहासात रस आहे त्यांनी www.dasbodh.com या साईट वर जावून तेथील ऐतिहासिक ग्रंथ, बखरी, इंग्रजी पुरावे तपासायला हवेत.
पुरावा संकलन - समर्थ रामदास स्वामी भक्त मंडळ
धन्यवाद! चोख माहिती दिलीत!
उत्तर द्याहटवासंभाजी ब्रिगेड ला त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे
उत्तर द्याहटवाभारततामध्ये समाज समाजांमध्ये फूट पडण्याचे काम ही संघटना करीत आहे, याना फक्त ब्राह्मणद्वेष करायचा आहे, या संघटनेचा आणी याना प्रेरणा देणाऱ्या महापुरुषांचा भारताच्या स्वातंत्रलढ्यात काहीही सहभाग नाही ,या उलट हे इंग्रजांना फितूर होते त्यावेळीही यांनी एकसंघ भारत करायचा सोडून सामाजिक फूट पाडण्यात धन्यता मानली आणि आताही ते हेच करत आहेत, समाजासमाजांमध्ये भांडणे लावून याना पुन्हा भारतात अशांतता पसरवून विदेशी शक्तींना मदत करायची आहे आपण याचा सर्वांनी अभ्यास करणे जरुरी आहे
उत्तर द्याहटवासमर्था सारखा सद्गुरु मिळणे हे विधिलिखित असावे,शिवाजी महाराजांनी आपल्या पत्रात पण उल्लेख केला आहे, परंतु आताच्या खोट्या इतिहासकार यांना शिवाजी महाराजांनी लिहलेल्या पत्रावर देखील विश्वास नाही, त्यांचा अजेंडा ठरलेला असावा म्हणूनच ही लोक काहीपण बर्गळ्यात
उत्तर द्याहटवासंभाजी ब्रिगेड ला ब्राह्मणा बद्दल कितीही बोंबलायला परवानगी आहे.पण इतिहासात मोडतोड करून हिंदू समाजाला मार्गभ्रष्ट करणे थांबवावे.तसेच एकदा कुराण वाचावे म्हणजे हिंदू धर्माची महती समजेल. नस्रोडमस चे पुस्तक वाचा 400 वर्षांपूर्वी ख्रिश्चिन आणि मुसलमान अत्यंत नीच आहेत हे सांगितले आहे.देव संभाजी ब्रिगेडी लोकांना सद्बुद्धी देओ.आपण इतकेच करू शकतो कारण आम्ही "नीच्यातील नीच हिंदू स्वतःचा " असे मानतो.
उत्तर द्याहटवाशंकर कुलकर्णी,(ब्राह्मण).
गुढीपाडवा या वर पण लेख लिहा
उत्तर द्याहटवा