सोमवार, २५ मे, २०१५

~: छत्रपती :~

शिवाजीमहाराजांपूर्वी अनेकांनी राजा हि पदवी घेतली होती व मुसलमान सत्तांनी तशी दिलीही होती. पण त्या पदव्या स्वातंत्र्य निदर्शक नव्हत्या. पदवीधर राजे बरोबरीच्या भूमिकेवरून तह करू शकत नव्हते. मराठा सरदारास 'स्वतंत्र' या शब्दातील अर्थाची कल्पनाच त्याकाळी नव्हती. स्वतंत्र म्हणजे दुसर्यांचे हुकुम पाळणारा नव्हे, हि कल्पना शिवाजीमहाराज त्यांस शिकवणार होते. स्वतंत्र राजा सैन्य जमा करतो, कर लादतो, स्वार्या करतो, बरोबरीच्या नात्याने तह करतो, न्यायनिवाडे करतो; या सर्व गोष्टींचा मूलभुत हक्क प्राप्त होतो तो राज्याभिषेकाने, हा स्वाभिमान तत्कालीन मांडलिकास शिकवायचे होते.
- © परशुराम चव्हाण



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा