गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१३

।। इंग्रजी शिक्षणपद्धती ।।

फार प्राचीन काळापासून जगभरात भारताबद्दल फार मोठे कुतूहल होते. भारत हा सुवर्णभूमी म्हणून म्हणून प्रसिद्ध होता. संपूर्ण जगाचे धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक नेतृत्व भारताकडे होते. जगाला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा उत्पादक देश म्हणून भारताचा लौकिक होता. वास्को-दा-गामा हा पोर्तुगीज खलाशी आफ्रीकाखंडाला वळसा घालून १५व्या शतकाच्या उत्तरार्धात (इ.स. १४९८) भारताला पोहोचला. युरोपीय देशांनी आपले नाविक सामर्थ्य फार वाढवलले होते. त्या बाळाच्या जोरावर त्यांनी जगातील इतर प्रांतामध्ये व्यापाराच्या उद्देशाने प्रवेश केला.

ईस्ट इंडिया कंपनी हि इ. स. १६०० साली स्थापन केली गेली व भारताशी व पौर्वार्त्य देशांशी व्यापार करणे हेच तिचे प्रमुख धोरण ठरले. इंग्लंड हा देश चिंचुक्या-एवढा एका बेटावर वसलेला होता. परंतु त्याच्या डोक्यात मात्र संपूर्ण विश्व काबीज करण्याची महत्वकांक्षा होती. सुवर्णभूमी भारतासमोर हा देश अगदीच नगण्यावस्थेत होता. इंग्रजांनी भारतात सुरत, राजापूर, कारवार येथे व्यापाराची केंद्रे उघडली.
इंग्लंड हा देश अन्नधान्ये व इतर वस्तू याबातीत स्वयंपूर्ण नव्हता म्हणून त्या गोष्टींची गरज भागवण्याकरीता त्यांना इतर देशांवर अवलंबून राहावे लागे. साहजिक नौकानयनामध्ये इंग्लंड पारंगत होता. थोमस मन ह्या समकालीन अर्थतज्ञाने ईस्ट इंडीया कंपनीची भूमिका स्पष्ट केली आहे.

" आपला देश हा समुद्राने का वेढला आहे? आमच्या लोकांच्या गरजा आमच्या खलाशांनी दुसऱ्या  देशात जाऊन कमीत कमी परिश्रम करून पुरवाव्यात म्हणूनच आम्हाला समुद्राचे वरदान लाभले आहे. अरबस्थानातील मसाल्याचे जिन्नस आम्ही तेथील हाह्क उन्हाची झळ न अनुभवता घरबसल्या घेऊ शकतो. आम्हाला रेशमी कपडे मिळतात पण त्यासाठी श्रम पडले नाही. द्राक्षांचे मळे आम्ही कधी फुलवले नाहीत पण मदिरेचा आस्वाद आम्ही घेतो. आम्ही खाणी खणल्या नाहीत पण त्यातून निघालेली संपती आपणास विनासायास मिळते. आम्ही दूरवर संचार करतो. आपली जहाजे पेरतो व जगातील प्रतेक देशाकडून उत्तमोत्तम वस्तू मिळवतो."
कंपनीने पत्रात लिहल्याप्रमाणे आपला हिंदूस्थानातील कारभार हळूहळू वाढवत नेला व हिंदूस्थानातील राजकारणात प्रत्यक्ष भाग घ्यावयास सुरवात केली. हे इंग्लंडमधील एडमंड बर्क नावाच्या तात्कालीन विचारवंताला खटकले. त्याने कंपनीचा धोरणावर टिका केली. बर्कच्या मते "कंपनी सरकार हे एक अत्यंत भ्रष्ट, जुलमी, आणि विनाशकारक सरकार आहे आणि कदाचित जगाच्या इतिहासात अशा प्रकारचे सरकार कधीच  अस्तित्वात आले नसेल. कंपनीने ह्या विधानाकडे दुर्लक्ष करून आपले पूर्वीचे धोरण कायम ठेवले.
शिवाजी राजासमोर कंपनीची डाळ शिजेना. त्यांनी आपले लक्ष हिंदूस्थानातील इतर भागावर केंद्रित केले. कंपनीला मराठ्यांकडून सर्वाधिक विरोध झाला. परंतु हिंदूस्थानातील अंतर्गत यादवीमुळे व मराठ्यांना आपापसंतील दुहीमुळे इ. स. १८१८ साली कंपनीने हिंदूस्थानावर पूर्णपणे कब्जा मिळवला.
आता कंपनीला आपली सत्ता कायम राखण्यासाठी निरनिराळ्या युक्त्या योजाव्या लागल्या. बंगाल, मद्रास व इतर प्रांतातून इंग्रजांना जास्त विरोध झाला नाही. सगळे आपणहून शरण आले. पण मराठ्यांचे तसे नव्हते. मराठ्यांनी स्वातंत्र्याची हवा चाखली होती. ते इंग्रजांना जुमानत नसत. इंग्रजांना हे पक्के ठाऊक होते की "भारतातील इतर प्रांतांना केवळ भूगोल आहे पण मराठ्यांना इतिहासदेखील आहे." मातीच्या ढेकळाचे रुपांतर अवाढव्य आहे पण मराठ्यांना किल्लामध्ये करण्याची किमया फक्त मराठ्यांना अवगत होती. मराठ्यांचे इंग्रज धार्जिणे बौध्दिक परिवर्तनाचे कार्य इंग्रजांनी घेतले होते.
इ. स. १८९७ च्या सुमारास पुण्यात आलेला जी. डब्लू. स्टीव्हन्स म्हणतो, "आपण (इंग्रजांनी) हिंदूस्थान जिंकला तो मराठे आणि शिखांपासून इतर हिंदुपासून व मुसलमानापासून नाही. शंभर वर्षापूर्वी आपण किती मोठे होतो आणि आज आपल्याला ह्या दशेत (पारतंत्र्य) कोणी आणले यांचा त्यांना (मराठ्यांना) अद्याप विसर पडला नाही. इतर सत्तेपेक्षा मराठ्यांचे नुकसान जास्त झाले हे त्यांना जाणवते. इतर सत्ता आपल्याला (इंग्रजांना) बिनविरोध शरण आल्या; मराठ्यांना मात्र आपल्याला रणांगणात जिंकावे लागले. इतरांना इंग्रज म्हणजे जुने धनी जाऊन नवीन धनी आले येवडाच फरक झाल्यासारखे वाटते; पण मराठ्यांना आपण धनी होतो, पण आत्ता गुलाम आहोत. ह्याची सतत खंत वाटत होती. "वरील मथल्यावरून इंग्रजांनी मराठ्यांचे पाणी कुठवर ओळखले होते हे दिसून येते. आपल्याला विरोध करण्याची हिंमत फक्त मराठ्यांत आहे हे धूर्त इंग्रजांना पक्के ठाऊक होते.

इंग्रजांनी मराठ्यांचे तथाकथित बौद्धिक परिवर्तन सुरु केले. आपली राजसत्ता तुकून राहावी अशी फायद्याची मतप्रणाली त्यांनी हिंदूस्थानी जनतेत आपल्या इंग्रजी शिक्षण पद्धतीद्वारे रुजवली. मराठ्यांना सरकार दरबारी सत्तेची उच्च स्थाने कदापि मिळू नये ह्यावर इंग्रजीसत्तेचा कटाक्ष असे. लॉर्ड मेकोले नावाच्या गृहस्थाने भारतातील इंग्रजी शैक्षणिक धोरण आखले. शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असावे असा मेकोलेचा आग्रह होता. "इंग्रजी शिक्षण दिल्याने पाश्यात्य विभूषित असा भारतीयांचा एक वर्ग इंग्रजी संस्कृतीचे सातत्याने गोडवे गात राहिल. जन्माने भारतीय परंतु विचार आचार व मनाने इंग्रजी अशी माणसे ह्या ठिकाणी तयार केली पाहिजेत. इंग्रजी शिक्षणामुळे भारतीय लोक युरोपियन शासन, संस्थाची मागणी करू लागतील तर तो दिवस इंग्रजांचा इतिहासातील अत्यंत अभिमानाचा दिवस असेल." असे मेकोलेने म्हटले होते. शिवाय पाच्यात्य शिक्षणामुळे विलायती वस्तूंची आवड निर्माण होईल व त्यामुळे आपल्या (इंग्लंडच्या) वस्तूंना योग्य गिऱ्हाईक मिळेल अशीही एक व्यापारी विचारधारा होती.
युरोपात फ्रेंच, ईटली, जर्मनी, रशिया या राष्ट्रात राजकीय क्रांत्या झाल्या पण इंग्लंडमध्ये अशी राजकीय क्रांती झाली नाही. ह्याचे कारण म्हणजे औधोगिक क्रांती. इंग्रज पक्के व्यापारी होते. इंग्लंडने जगभरात आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या. त्या वसाहतीमधून इंग्लंडला मुबलक प्रमाणात कच्चा माल मिळू लागला होता शिवाय पक्का माल विकण्यास तयार बाजारपेठाही मिळाल्या. त्यातूनच इंग्लंडमधील स्थानिक जनतेला रोजगार मिळू लागला व इंग्लंडची राज्यक्रांती टाळली गेली. त्याजागी भांडवलशाहीचे बीज रोवले गेले. स्थानिक प्रजेचे कामगार वर्गामध्ये रुपांतर झाले.  त्यांचे शोषण पुढे तसेच चालू राहिले.

पुढे 'नेपोलियन बोनापार्ट' सारख्या जबरदस्त विरोधकाला इंग्रजांनी इ. स. १८१५ साली नेस्तनाबूत केले. त्यामुळे इंग्रजांना भारतातील आपल्या कारवाया अधिक वेगाने करण्याची संधी प्राप्त झाली. आर्थिक विस्तारवादी हे भारतामधील इंग्रजांच्या साम्राज्यवादी धोरणाचे प्रमुख अंग होते. दुय्यम स्थान धर्मप्रसाराला दिले होते. इंग्रजांनी भारताला कच्चा मालाच्या निर्यातदार व पक्का मालाचा आयातदार बनवून ठेवले. भारतातील शिक्षणपद्धतीमध्ये जाणूनबुजून राष्ट्रवादी विचारांचा अभाव ठेवला गेला व भारतातील शिक्षण पद्धती कारकूनी व सरंजामशाहीला प्रोत्साहन देणारी अशी बनवून ठेवली.

इंग्रजी शिक्षणपद्धतीमुळे आम्हा भारतीयांचा भूगोल तोंडपाठ झाला. पण त्या भूगोलाचा आत्मा 'इतिहास' मात्र भुईसपाट झाला. इतिहासातून, गत अनुभवातून शिकवण्याचे कसब आम्हाला शिकवले गेले नाही. जेणेकरून आम्ही त्याच चुका पुन्हा पुन्हा करीत राहाव्या. इंग्रजांनी इंगजधार्जिण्या इतिहास आम्हाला शिकवला. मध्ययुगीन सुलतानांनी मराठ्यांना वतनावरून झगडाला शिकवले आणि इंग्रजांनी जातीवरून भांडायला शिकवले. आपल्या हुकुमशाही व्यवस्थेवरून लोकांचे चित विचलित करण्याकरिता इंग्रजांना भारतीयानमध्ये भांडणे लाऊन देण्याच्या कार्यक्रम अधिक उपयुक्त वाटला. इंग्रजांनी जातीयवादाला, अंधश्रद्धाना खतपाणी घातले. त्यासाठी इंग्रजांनी एक नवीन 'आयडिया' शोधून काढली. आर्य आणि आर्यतर असे खोटे संशोधन भारतीयांच्या कपाळी मारले. आर्य खैबरखिंडीतून भारतात आले व त्यांनी येथील मूळ लोकांवर अत्याचार केले म्हणे ! जणू काही इंग्रज लोक हे स्थलांतर होत असताना एका टेकडीवर बसून बघत होते. एखाद्या हॉलीवूड चित्रपटात शोभावे असे बिन-बुडाचे हास्यास्पद सिद्धांत इंग्रजांनी इंग्रजपढीत? (इंगजपिडीत) भारतीय इतिहासकारांचा गली घोटवले. ह्या आंग्ल- विद्याविभुषित ! तथाकथित इतिहासकारांनी आपली बुद्धी गहाणच ठेवली होती. इंगजी भाषा म्हणजे ह्यांना परमात्म्याचा प्रसाद वाटत असे. मग हे इंग्रजपिडीत तथाकथित इतिहासकार जणू देवाच्या साक्षात्कार झाला अशा थाटात ते इतर भारतीयांना सांगू लागले. त्याचा परिणाम असा झाला की 'ब्रिटिशांचे राज्य हा दैवी प्रकोप नसून एक मोठी दैवी देणगी आहे.' असे मानणाऱ्या विचारवंताच्या ! एक गट नंतरच्या काळात भारतीय राजकारणाच्या अस्तित्वात आला. त्यातूनच पुढे मवाळवाद जन्माला आला. क्रूरकर्मे सुलतान लोक ह्यांच्या लेखी शांतीचे दूत बनले आणि भारताच्या स्वातंत्रासाठी फासावर जाणारे वीर क्रांतिकारक हे वाट चुकलेले देशभक्त ठरले. इंग्रजी शिक्षणपद्धतीने भारतीयांचे मने नासवली.

काय झाले तुझा असा देवदास का?झाला.जगात जेथे जेथे इंग्रजी साम्राज्य होते तेथे इंग्रजांनी तेथील जनतेची दिशाभूल करण्याच्या कार्यक्रम राबवला. एतदेशीय समाजात भांडणे लाऊन त्याचा फायदा ब्रिटीश-राजवटीला करून घेणे हि इंग्रजी 'devide and rule' नीती भारताला फार घातक ठरली. समानतेऐवजी विषमताच इंग्रजी शिक्षणाने पोसली गेली. त्याचा फटका राष्ट्राच्या एकात्मतेला, एकीकरणाला बसला व देश फाळणीच्या उंबरठ्यावर उभा राहिला.

१९४७ साल उजाडले. इंग्रज भारतातून निघून गेले. परंतु इंग्रजांची विषारी शिक्षण व्यवस्था, न्यायव्यवस्था, शासनव्यवस्था तशीच राहिली. आज साठ वर्षांनी आपल्याला त्याचा प्रत्यय पुरेपूर येत आहे. परकीय शिक्षणपद्धतीची किड  आज आपल्या समाजात खोलवर रुजलेली आहे. जातीभेद पूर्वीपेक्षा जास्त उफाळून वर येत आहेत. कारण एकच "विंचू निघून गेला पण आपली विषारी नांगी आपल्या व्यवस्थांचा माध्यमाने येथेच ठेऊन गेला."

सध्याच्या शिक्षणपद्धतीमुळे भारतीयांचा असा एक गोड गैरसमज निर्माण झाला आहे की आमचे पूर्वीचे लोक, अडाणी, अशिक्षित, मागासलेले होते. भारत खूप दरिद्री होता. पण आपल्या डोक्यात चुकुनही असा प्रश्न निर्माण होत नाही कि, भारत खोरोखर जर इतका दरिद्री होता, तर ह्या दरिद्री भारतात इंग्रज लोक व्यापार करण्यास उस्तुक का होते? गरीब भारतातून इंग्रजांना असा काय नफा मिळत होता? जर नव्हता ! तर काय इंग्रज लोकांनी भारताला श्रीमंत करण्याचा विडा उचलला होता काय? आणि भारताची भरभराट करण्याचे उदात्त कार्य करण्यासाठीच, हे टोपीकर सभ्य ! गृहस्थ आपली मुलेबाळे सोडून साता- समुद्रापार आले होते काय? तरीही आपण असे समजू की, इंग्रजांनीच भारताची भरभराट केली. तर मग इ. स. १९४७ साली आपण अशा ह्या सभ्य ! लोकांना 'चले जाव' 'quit indiya' असे का म्हटले? भारताला मदत करणाऱ्या ! अशा ह्या पुण्यवान  ! इंग्रजांना या देशातून 'चले जाव' म्हणणारे आपले सगळे देशभक्त मूर्खच म्हटले पाहिजेत !

इंग्लंड हा देश स्वत:तरी खूप समृद्ध होता काय? अन्नधान्ये व कच्चा माल ह्यासाठी तो इतरांवर अवलंबून होता. कारखानदारीचे सगळे बाह्य दुष्परिणाम इंग्लंडच्या स्थानिक प्रजेला भोगावे लागत होते. दुसऱ्या महायुद्धामुळे इंग्रजांचे कंबरडे मोडले होते. आग्नेय आशिया व भारताची पूर्वोत्तर राज्ये आझाद हिंद सेनेने ताब्यात घेतली होती. मुंबईतील नौ- सेनिकही बंड करून उठले होते, तेव्हा इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान यांनी संसदेमध्ये स्पष्ट सांगितले की, " भारताला आपण पूर्वीप्रमाणे गुलाम बनवून ठेऊ शकत नाही. तेव्हा त्याला स्वतंत्र करणे क्रम:प्राप्तच आहे.'

याची कुणकुण लागताच इंग्रजपिडीत वर्ग पुढे सरसावला व म्हणू लागला की 'भारताला स्वतंत्र मिळाले; इंग्रजांनी भारताला स्वातंत्र दिले.' इंग्रजांनी भारताला स्वातंत्र दिले ? खरे काय होते ? वास्तविक इंग्रजांनी भारताला स्वातंत्र दिले हे चूक असून "भारतीयांची इंग्रजांकडून ते लढून मिळवले" हे सत्य होय. स्वातंत्र काय कुठे रस्त्यावर पडले होते काय? ते मिळवायला ! इंग्रजपिडीत पोपटानी भारतीयांमध्ये स्वदेव, स्वदेश, स्वधर्म, यांच्या बद्दल आकस निर्माण करण्याव्यतिरिक्त दुसरे काही केले नाही. इंग्रजांनी अब्जावधी रुपयांची संपती भारतातून लुटून नेली, याबद्दल हे इंग्रजपिडीत एक अवाक्षरही चुकून काढत नाहीत. म्हणून आपणा सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे की हे विषारी शिक्षणपद्धतीचे बांडगूळ उखडून त्याजागी स्वदेव, स्वदेश आणि स्वधर्म शिकवणारी नवी शिक्षणपद्धती आचरणात आणली गेली पाहिजे, तरच हिंदूस्थानचे स्वातंत्र अबाधित राहू शकते.

जय भवानी जय शिवाजी
जय हिंदुराष्ट्र.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा