आम्ही आपल्या परवानगीशिवाय
[आग्र्याहून] परत आलो. हे करावे लागणे आमचे दुर्भाग्य. परंतु आम्ही
हरप्रकारे आपली सेवा करण्यास यापुढेही कटिबद्ध आहोत. आपला हितेच्छू या
नात्याने आम्हास काही गोष्टी आपल्या निदर्शनास आणून द्यावयाच्या आहेत.
आमच्या कानी असे आले आहे, की आमच्याबरोबर युद्ध करता करता आपले खजिनेही रिते होत चालले आहेत; आणि हा खर्च भरून काढण्यासाठी आपण हिंदूंवर जिझिया कर लादण्याचा निर्णय घेतला आहात.
सम्राट अकबर यांनी तुमच्या साम्राज्याची स्थापना केली आणि बावन्न वर्षे राज्य केले. ख्रिस्ती, यहूदी, मुसलमान, दादूपंथी [कबीरांचे शिष्य दादू (१५४४-१६०३) यांचे अनुयायी], Stargazers [म्हणजे कोण?!], malaki [म्हणजे सुद्धा कोण?!], नास्तिक [सेतू माधवराव पागडी यांनी Atheist शब्द वापरला आहे. मूळ शब्द "काफ़िर" असू शकेल, ज्याचा आलमगीरकरता लौकिकार्थ "हिंदू" होतो], ब्राह्मण, जैन, वास्तविक सर्वच धर्म-पंथांना शांततेने आणि समानतेने वागविण्याची अत्यंत उत्कृष्ठ अशी नीती त्यांनी अंगीकारली होती. सर्वांचेच कल्याण आणि रक्षण हे त्यांचे ध्येय होते. म्हणूनच तर ते जगद्गुरू मानले गेले. आणि याचाच परिणाम म्हणून ते ज्या ज्या दिशेने गेले त्या त्या दिशेने त्यांच्याकडे सुयश आणि सुकीर्तीच त्यांना मिळाली. देशाचा जवळपास सर्व भूप्रदेश त्यांनी आपल्या अधिपत्याखाली आणला.
त्यांच्या नंतर नूर-उल-दीन जहांगीर यांनी बावीस वर्षे राज्य केले. अतिशय उत्तम कार्ये करून ते अमर झाले.
शाहजहान यांनी बत्तीस वर्षे राज्य केले. त्यांनीही उत्तम कार्याने आपले आयुष्य सुफल केले.
म्हणूनच हे राज्यकर्ते जिकडे जातील तिकडे त्यांना यश मिळत राहिले. त्यांच्या कारकीर्दीमध्ये अनेक प्रदेश, गड-किल्ले त्यांच्या अधिपत्याखाली आले. ते आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांची नावे आजही आपण घेतो आहोत. त्यांची महत्ता अवर्णनीय आहे. याचा एक दाखला हा देखील आहे की खुद्द आलमगीर त्यांचे अनुकरण करण्याचा निष्फल प्रयत्न करीत आहेत, आणि हे प्रयत्न निष्फल होण्याचे कारण त्यांना अद्याप समजले नाही.
या आपल्या पूर्वसूरींनी मनात आणले असते तर जिझिया कर लावण्याची क्षमता त्यांच्यातही निश्चितच होती. परंतु त्यांना जाणवले की सर्व लहानथोर व्यक्ती ही परमेश्वराचीच अपत्ये आहेत, आणि सर्व धर्म हे त्या सर्वशक्तिमान परमेश्वराची आराधना करण्याचे विविध मार्ग आहेत. धार्मिक द्वेष त्यांनी मनाला शिवू देखील दिला नाही. सर्व लहानथोर त्यांची स्तुती करतात, त्यांना दुवा देतात. त्यांच्या कारकीर्दीत लोकांना शांतता मिळत राहिली, ज्यामुळे त्यांची कीर्ती दिवसेंदिवस वृद्धिंगत राहिली आणि प्रत्येक कार्यात त्यांना यश मिळत गेले.
परंतू आपल्या कारकीर्दीमध्ये कित्येक प्रांत आणि किल्ले आपल्या हातातून निसटून गेले. जे प्रांत आणि किल्ले शिल्लक आहेत ते देखील जातील अशी स्थिती आहे. फार कशाला, अगदी आम्ही स्वतः देखील या प्रांतांवर चाल करावयाला मागेपुढे पाहणार नाही! आपले मांडलिक ध्वस्त झाले आहेत. परगणे आणि महालांमधून आपणाला मिळणारे उत्पन्न दिवसेंदिवस घटत चालले आहे. जेथे पूर्वी लाखांचे उत्पन्न यावे तेथून हजारांचेही उत्पन्न मिळणे कठीण झाले आहे. राजे आणि राजकुमारांनाही गरीबीच्या झळा पोहोचत आहेत. आपले सरदार आणि मन्सबदार देखील अडचणीत आल्याचे सर्वश्रृत आहे. सांप्रत आपले सैन्य असंतुष्ट आहे, मुसलमान त्रस्त आहेत, हिंदू दैन्य-दारिद्र्याच्या झळा सोसत आहेत. स्वतःच्या तोंडात मारून घेऊन त्यांची तोंडे आरक्त आहेत.
ते या दुःखाच्या गर्तेत आहेत, आणि तरीही आपण जिझिया लावला आहे. आपण हे कसे करू शकता? ही दुष्ट वार्ता पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत पसरलेल्या आपल्या साम्राज्यात वार्यासारखी पसरेल. नागरिक म्हणतील "हिंदुस्थानच्या सम्राटाने भिकेचा कटोरा हाती घेतला आहे, आणि तो ब्राह्मण, जैन, साधू, योगी, सन्यासी, बैरागी, गरीब आणि भुकेल्या लोकांमडून जिझिया वसूल करतो आहे. आणि हे करण्यात त्याला अभिमान वाटतो आहे. त्याने तैमूर खानदानाचे नाव धुळीला मिळवले." लोकांची ही अशी तीव्र प्रतिक्रिया येईल.
हुजूर, कुरआन मध्ये परमेश्वराचे वर्णन "रब-उल-अल-आमीन" म्हणजे विश्वाचा परमेश्वर असे केलेले आहे, "रब-उल-मुस्लिमीन" म्हणजे मुसलमानांचा परमेश्वर असे नव्हे. वस्तुतः इस्लाम आणि हिंदुत्व हे दोन्ही दैवी प्रेरणेच्या सुंदर निर्मिती आहेत. मशिदींमधून बांग दिली जाते तश्याच मंदिरांतून घंटा निनादित केल्या जातात. धर्मांध आणि धर्मद्वेष्टे हे परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन करतात असे म्हणावे लागेल. त्या कलाकार असलेल्या परमेश्वराने काढलेल्या सुंदर चित्रावर रेघोट्या मारण्याचे हे मनसुबे त्या दैवी कलाकाराला दूषण आहे. [To presume to draw lines on these pictures is verily to lay blame on the Divine Artist (God).] एखाद्या निर्मितीतील दोष काढणे हे त्याच्या निर्मात्याचेच दोष काढणे आहे. तसे आपण करू नका.
सदसद्विवेकाच्या दृष्टीने पाहता जिझिया कोणत्याही आधारावर समर्थनीय नाही. हा केवळ भारतापुरता लावलेला "शोध" [जावईशोध] आहे. हा अन्याय आहे.
तरीही जर आपणास धार्मिक आणि न्यायिक आधारांवर जिझिया कर लावणे आवश्यक वाटत असेल, तर आपण सर्वप्रथम राजा राजसिंग यांचेकडून तो वसूल करून घ्यावा. कारण ते हिंदूंचे प्रमुख नेते आहेत. त्यानंतर या आपल्या हितेच्छूकडून तो वसूल करणे आपणास अवघड जाणार नाही.
संदर्भ: http://pakteahouse.net/2012/04/26/shivajis-letter-to-aurangzeb/

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा