सोमवार, १७ फेब्रुवारी, २०१४

प्यार के दुष्मन : - ब्लडी शिवसैनिक

इंग्लंड कवी शेले म्हणाला होता की ’ तुमच्या देशातील तरुण पिढीच्या ओठावरचे शब्द काय आहेत ते सांगा मी तुम्हाला तुमच्या देशाचे भवितव्य सांगतो’. हाच नियम जर आपल्या देशातील तरूणांना लावायचा झाला तर आपल्या देशातीत तरुणांच्या ओठावरचे शब्दच काय तर मने सुद्धा काहीशी ....."भिगे ओठ तेरे ..प्यासा दिल मेरा"..! अशाप्रकारची झालेली आहेत. मग विचार करण्याची गोष्ट ही आहे की हे वास्तव पाहून शेले याने आपल्या देशाचे भवितव्य काय वर्तवले असते ? सध्या वेलेंटाईन डे च्या नावाखाली काहीही व्याभीचार केला तर चालतो अशाप्रकारचे काहीतरी अभद्र समिकरण बानले आहे.

: प्रेम म्हणजे काय :
सध्या आपल्या तरूण तरूणींचे एकमेकांबद्दल प्रेम अक्षरश: उतू चालले आहे की काय असे वाटू लागते. पण शेवटी एक साधा प्रश्न मनामध्ये उभा राहतो की हे प्रेम, प्रेम म्हणतात ते नेमके काय आहे ? वास्तविक सांगायचे झाले तर आज ज्याला ’प्रेम’ म्हणुन वाट्टेल ते करण्याची पद्धत रुढ झालेली अहे ते प्रेम म्हणजे दुसरे-तिसरे काहीही नसुन ’समवयीन भिन्नलिंगी आकर्षण’ होय ! याच अकर्षणाला ’प्रेम’ असे गोजीरवाने नाव देवून व्याभीचाराला चालना देण्याचे प्रकार चालू आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर व्याभीचार हा प्रेमाचे कातडे पांघरुन पसरतो आहे .. अगदी वृत्तपत्रे, दुरदर्शन, रेडीऒ यांसारख्या प्रसारमाध्यमांमधून सुद्धा . आजचा(१४ फेब्रुवारी) पेपर उघडा . आज एक विशेष पान छापले गेले असेल त्यात काय आहे ? टिव्ही लावा ..एखादे गाणे लागले असेल त्या गाण्याचे बोल ऐका त्यात काय आढळते ? रेडीऒ ऑन करा एखादे गाणे लगले असेल अथवा एखादा आर.जे. काहीतरी बोलत असेल त्याचा बोलन्याकडे लक्ष द्या काय निष्पन्न होते ..... ? शेवटी फिरुन पिरून आपण ’प्रेम’ अर्थात ’समवयीन भिन्नलिंगी आकर्षण’ या प्रकाराला चालना देणारी माध्यमांकडेच जातो. परकिय़ांचे पाहून आपण त्यांच्या प्रमाणे मदर्स डे व फादर्स डे साजर करु लागलो व त्यातुनच एक दिवस फक्त आई वडीलांना म्हणजे जे काही आई वडिलांसाठी करायचे आहे ते फक्त याच दिवशी करायचे व उरलेल्या दिवशी त्यांना विचारायचेही नाही साधारण अशाप्रकारची मनोववृत्ती आपली बनत गेली. मग आम्ही याच्याही पुढे गेलो, मदर्श डे व फादर्स डे बरोबरच रोझ डे साजरा करु लागलो अर्थात तेही पाश्चात्यंचे शिकून, यादिवशी आम्ही आमच्या प्रिय व्यक्तींना गुलाबाची फूले देण्यास शिकलो थोडक्यात व्याभीचाराची एक पायरी गाठली. याने समाधान झाले नाही म्हणुन आम्ही फ्रेंडशीप डे ही साजरा करायला लागलो, एकमेकांच्या हातामध्ये रंगीबेरंगी बॅंड्स बांधून आम्ही आपले मित्रप्रेम (मैत्रीणप्रेम सुद्धा) व्यक्त करु लागलो , आत आम्ही याच्याही पुढे गेलो आहोत आम्ही वेलेंटाईन डे म्हणजे प्रेम दिवस व आपल्या भाषेत ’समवयीन भिन्नलिंगी आकर्षण दिवस’ सुद्धा साजरा करायला लागलो. या दिवशी आमचे तरूण तरुणी एकमेकांजवळ आपले ’प्रेम’ व्यक्त करु लागले. आत याच्याही पुढे जायचे म्हटले तर रेप डे व सेक्स डे तेवढा शिल्लक राहीला आहे . काही दिवसात आम्ही तो सुद्धा टप्पा गठण्यात यशस्वी होऊ यत शंक वाटत नाही.

शिवसैनिकांना सध्या ’प्यार के दुश्मन’ असे म्हटले जाते कारण ते वेलेंटाईन डे ला विरोध करतात अर्थात ते प्रेम दिवसाला विरोध करतात म्हणजेच ते प्रेमाला विरोध करतात असा समज हे ’प्रेम’विर तरुण-तरुणिंचा आहे. एकमेकांपाशी प्रेम व्यक्त करुन आपणच काय ते प्रेम करतो व हे शिवसैनीक या प्रेमाला विरोध करतात हे प्रेमाचे शत्रू.. प्यार के दुश्मन ..ये क्या जाने प्यार क्या होता है ! बंदर क्या जाने अंगूर का स्वाद, ब्लडी शिवसैनिक्स, लाज कशी नाही वाटत यांना प्रेमासारख्या पवित्र नात्याला विरोध करायला , अशाप्रकारची वाक्ये शिवसैनीकांना नविन नाहीत .. थोडक्यात सांगायचे झाले तर आमच्या शिवसैनिकांना अशाप्रकारच्या वाक्यांची सवय झालेली असते . म्हणे काय तर ’प्यार के दुश्मन ..ये क्या जाने प्यार क्या होता है !’ बरोबर आहे !आमच्या शिवसैनिकांना तुमचे हे असले व्याभीचारी प्रेम कधीच क्कळणार नाही , कारण ते प्रेम करतात ते आपल्या मातृभूमिवर , ते प्रेम करतात छत्रपती शिवरायांवर, ते प्रेम करतात बाळासाहेबांवर, महाराष्ट्रावर, देशावर व शेवटी आपल्या धर्मावर त्यांचे प्रेम नि:स्वार्थ आहे अशा निस्वर्थ प्रेम करणार्‍यांना तुमचे ’समवयीन भिन्नलिंगी आकर्षण युक्त व्याभीचार युक्त "प्रेम" कधीच कळणार नाही . कोण्या एका वेलेंटाईन का कोण त्याने कोठे तरी दोन प्रेमविरांना एकत्र आणले म्हणून त्याच्या नावाने या मातीशी काडीचाही संबंध् नसताना आमचे प्रेमविर तरून त्याच्या नावाचा दिवस येथे साजरा करतात. पण या मातृभूमीवर प्रेम करणारे आमचे शिवसैनिक या मातीशी कसलाही संबंध नसनार्‍या वेलेंटाईनच्या नावाचा उदो-उदो कसा काय सहन करुन घेतील ? या देशात जयजयकार होईल तो फक्त शिवरायांचा....महाराणा प्रतापांचा....तुकोबारायांचा....रामदासांचा....संभाजी महाराजांचा....बाळासाहेबांचा ! ना की फॉरेन हून इम्पोर्ट केलेया फडतूस वेलेंटाईन चा !

या वेलेंटाईन ला पाश्चात्य देशात संत म्हणतात म्हणे ! काय केले म्हणे त्याने तर दोन प्रेम करणार्‍यांना एकत्र आणले वगैरे अशा व्यक्तीला पाश्चात्य देशात संत पूजले जाते . बरोबर आहे संतांचा आभाव असलेले व व्याभिचारासाठी आसुसलेल्या देशांमध्ये वेलेंटाईन जर संत ठरत असेल तर आश्चर्य वाटायला नको.... आश्चर्य तर या गोष्टीचे वाटते की जी भूमी देवांची माणले जाते.... ग्रीक लोक आजही भारतभूमीला ’देवभूमि’ माणतात, आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमि मानले जाते .... अशा भूमी मध्ये सुद्धा वेलेंटाईन सारख्या सोम्या-गोम्याला त्याचे संत पद मान्य करुन त्याच्या नावाचा दिवस साजरा केला जातो ?

प.पू. साध्वि रितंभरा यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर ’आज आपले आंगण, प्रांगण, धरा, आकाश, सर्वच प्रदुषीत झालेले आहे, मग ते प्रदुषण ग्लोबल वॉर्मिंग सारखे असो अथवा वैचारीक असो.’ योगवादी संस्कृतीचा र्‍हास होऊन भोगवादी संस्कृती जम धरत आहे अशा परिस्थितिमध्ये जर वेलेंटाईन सारखा दिवस साजरा होऊ शकत असेल तर नवल वाटायला नको. " दोन प्रेम करणार्‍यांच्यामध्ये येणारे हे कोण ? " , " एकमेकांची परवानगी असेल तर यांच्यामध्ये येणारे हे कोण ? " , "आमच्या आईवडील आम्हाला बोलत नाहीत तर आम्हाला विचारणारे हे कोण ?" साधारण अशाप्रकारचे पुचाट प्रश्न आमच्या शिवसैनिकांना विचारणारे अक्कलहुशार अपल्याला ठीकठिकाणी अढळतील आणि आपले बिचारे शिवसैनिक मात्र अशा प्रश्नांपुढे गोंधळून जातात. दोन प्रेम करणार्‍यांच्यामध्ये येणारे हे कोण (?) अरे ..! तुम्ही दोघे प्रेम करता ना ? मग तुमचे हे प्रेम तुमच्यापर्यंतच राहूद्या ना ! तुम्ही तुमचे हे ’व्याभीचारी’ प्रेम घेवून शिवरायांच्या गडकोटांवर व पवित्र मंदिरांमध्ये कशासाठी येता ? असा खणखणीत प्रतिप्रश्न आपल्या शिवसैनिकांनी केला पाहीजे ! अरे .. ! तुमचे एकमेकांवर ईतकेच प्रेम असेल ना तर ते दोघांपैकी एकाच्या घरी जावून उतू जावूद्या ना ! ते उतू घालवण्यासाठी तुम्ही आमची पवित्र मंदीरे व छत्रपति शिवरायांच्या आणि मर्द मावळ्यांच्या पुण्यस्पर्शाने पावण झालेल्या गडकोट का निवडता याचे उत्तर आम्हाला ’दोन प्रेम करनार्‍यांच्यामध्ये येणारे तुम्ही कोण’ असा प्रश्न विचारणारा एखादा तरी अक्कल हुशार देवू शकेल काय ?

गडकोट ज्याच्याशिवाय शिवरायांनी उभ्या आयुष्यात दुसर्‍या कशाचाही विचार केला नाही तिच शिवतिर्थे आज पोरी फिरवण्याची आणि दारू पिण्याची अड्डी बनली आहेत . परकिय ’संत’ वेलेंटाईनच्या नावाखाली गडकोट-आणि मंदिरे यांच्या सान्निध्यात चाललेला व्याभीचार शिवरायांवर प्रेम करणारा कोणता शिवप्रेमी, शिवरायांचा सैनिक म्हणवून घेणारा कोणता शिवसैनिक, आणि या मातृभूमीवर नितांत प्रेम करणारा कोणता सच्चा निष्ठावंत खपवून घेईल ?? ज्या शिवरायांवर आमचे शिवभक्त प्राणापेक्षाही अधीक प्रेम करतात, त्याच शिवरायांच्या समाघीखाली, तानाजी मालूसरेंच्या सिंहगडाकाली चाललेले असले प्रेमाचे चाळे कोणता शिवभक्त खपवून घेईल या प्रश्नाचे उत्तर आम्हाला ’दोन प्रेम करणार्‍यांच्यामध्ये येणारे हे कोण ? असा प्रश्न विचारणार्‍यांना द्यावा लागेल !

तुम्हाला तुमचे जे काही प्रेमाचे पर्यायाने व्याभीचाराचे चाळे करायचे असतील ते आपापल्या घरी जावून करावेत, आमचे काहीच म्हणने नाही , परंतु वेलेंटाईन डे च्या नावाने जर का तुमची पाऊले पन्हाळगडावर, रायगडावर, राजगडावर वळू लागलीत तर ती पाहूले मुळापासून उखडण्याची जबाबदारी आमच्या शिवसैनिकांची असेल !

- सुरज महाजन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा