बुधवार, १२ मार्च, २०१४

समर्थांनी संभाजीराजांना एक पत्र लिहिले

शिवराय गेले...आणि संभाजीराजे स्वराज्याचे छत्रपती झाले...

समर्थांनी संभाजीराजांना एक पत्र लिहिले, ते सर्वांना माहित आहे...

शिवरायांचे आठवावे रूप।
शिवरायांचा आठवावा प्रताप...

या पत्रातील शेवटच्या ओळी अपार महत्वाच्या आहेत!

"याहुनी करावे विशेष ।
तरीच म्हणवावे पुरुष ।
याऊपरी आता विशेष ।
काय लिहावे॥"

अर्थात, शिवरायांहून विशेष पराक्रम गाजवून दाखवाल तरच तुम्ही खरे!
काय पोटतिडकीचा संदेश आहे पहा!

संभाजी महाराजांनी हा संदेश मनावर घेतला असेल का हो? इतिहासात याचे उत्तर सापडते!

छत्रपती शिवरायांना एकुण ३५ वर्षांचे सामरिक आयुष्य लाभले...(युद्ध केलेला काळ), या काळात त्यांनी सुमारे २३० लढाया केल्या...त्यात ७ वेळा त्यांना पराभूतही व्हावे लागले...परंतु त्यांनी मोठ्या चातुर्याने नेहेमी एका वेळी एकच शत्रू अंगावर घेतला!

या उलट शंभुराजांना केवळ ९ वर्षात १३० युद्धे करावी लागली...व शत्रू आता सावध झालेला असल्याने सर्वजण मिळुन हिंदवी स्वराज्यावर तुटून पडले होते!डच,फ़्रेंच,पोर्तुगीज,इंग्रज,हबशी,निजामशाह,आदिलशाह,कुतुबशाह,बरीदशाह,इमादशाह,मुघल असे सर्वजण एकदम महाराजांवर तुटून पडले व या सर्वांना दाताडावर आपटवून संभाजी महाराजांनी १३० च्या १३० लढायांत विजय संपादन केला!!!!
काय तोडीचा योद्धा असेल हा!!!
शेवटी शत्रूला कळाले की हा गडी समरांगणात आटोपत नाही! यांना धरावयास केवळ कपटनीतीच करावी लागेल! फ़ंदफ़ितुरीशिवाय हे शक्य नाही!
आणि तेच करीत, राजांच्या सख्या मेहुण्यास फ़ितवून (गणोजी शिर्के), मुकर्रबखानाने हा डाव साधला...शंभुराजांबद्दल,त्यांचा समकालीन एक अरब लेखक, व औरंग्याचा चरित्रलेखक, खफ़ीखान त्याच्या "बादशाही-इ-आलमगिरी" या ग्रंथात म्हणतो,
"संभुजी कपटीपणात, क्रूरपणात,पराक्रमात आपल्या बापाहून दहापट अधीक भयानक आहे!"
आणि इथेच सिद्ध होते की "याहुनी करावे विशेष" या शब्दांना काय वजन महाराज देतहोते!

संभाजी महाराजांच्या बलिदानामुळेच पुढे मराठ्यांनी चवताळून उठत, ना सेना, ना सेनापती, ना राजा, ना राजधानी अशा अवस्थेत दिल्लीवरच काय तर अटकेपार भगवे झेंडे फ़डकविले!
हा इतिहास समाजाच्या लक्षात राहिला तर आपला देश उन्नत होईल, प्रखर होईल, प्रगत होईल..
जोवर संभाजीराजे हिंदूंच्या हृदयात जिवंत आहेत तोवर हिंदुस्थान जगाचा बाप आह!!!

www.dasbodh.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा