मदारी मेहतर असे नाव घेऊनही त्यास सत्य की मिथ्या? असे संबोधले आहे,
वाचकांना थोड़े अजब वाटेल खरे पण याच अनामिक – मदारी मेहतर या
व्यक्तिमत्वाचे इतिहासातील स्थान किती खरे आहे हे तपासून पाहणे गरजेचे आहे.
अश्या नावाच्या व्यक्तीचा शिवाजी महाराजांशी आग्रा भेटीच्या वेळी खरच काही संबध आला का? सद्य स्थितीत रायगडावर असणारे ठिकाण ज्याला मशीद मोर्चा किंवा मदारी मेहतर मोर्चा असे सांगितले जाते त्यात किती सत्य आहे?
वाद विवादासाठी आपण खरे मानले तर मदारी मेहतर
ही व्यक्ति स्वराज्यात कधी आली? त्याचा संबध शिवाजी महाराजांशी परत कधी आला (खरच आला का?) या सर्वांचा मागोवा आपण आता घेऊयात.
दि. ५ मार्च १६६६ रोजी पुरंदरच्या ठरल्या तहानुसार शिवाजी महाराज आग्रा येथे औरंगजेबास भेटावयास गेले. या संपूर्ण आग्रा प्रकरणाचा आढावा आपण सविस्तर प्रकरणामधे घेतलेलाच आहे. शिवाजी महाराजांसोबत आग्रा येथे असणाऱ्या काही साथीदारांची नावे आपल्याला मिळतात पण प्रकर्षाने मराठी, राजस्थानी, मुघल सहित्यामध्ये मदारी मेहतर हे नाव आढळत नाही. याचा खल करताना याची सुरवात नक्की कधी झाली हे पहावे लागेल.
ऐतिहासिक अस्सल संदर्भांची छाननी केली असता मदारी असे नाव असणारा एक व्यक्ति होता ही माहितीच मुळात मिळत नाही. या संबधीचा पहीला उल्लेख आपणास मिळतो तो भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे प्रकाशित केले जाणारे त्रैमासीक वर्ष १९१७ यात एक लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखामधे एक पत्र आणि एक हकीक़त दिली आहे. सदर हकीकत सातारा येथील राजोपाध्ये घराण्यातील कागदपत्रात मिळाली आहे. पण ही हकीकत
कुणी आणि कधी लिहिली आहे याबद्दल माहिती मिळत नाही.
सदर हकिकतीचा अभ्यास केल्यानंतर काय माहिती मिळते ती पाहुया.
१) शिवाजी महाराजांवर मिर्ज़ा जयसिंग राजे व दिलेरखान चालून आले.
२) त्याच्या (मिर्ज़ा जयसिंग) सांगण्यावरून महाराज दिल्लीस गेले.
३) पातशाहची भेट घेऊन त्याने महाराजांना अटकेत ठेवले.
४) महाराजांनी हीरोजीला विचारले – ‘ये समई संकट पडले तर माजे जीवाचे सारथी कोन कोन आहेत ?’
हे उल्लेख वाचल्यानंतर शंकेला पहिली जागा इथेच निर्मांण होते कारण ५ मार्च १६६६ रोजी शिवाजी महाराज राजगडावरून निघाले आणि आग्र्यास ११ मे १६६६ रोजी पोहचले. भेटीच्या प्रसंगानंतर महाराजांना कैद झाली. ३ महिन्याच्या कालानंतर १७ ऑगस्ट १६६६
रोजी महाराज आग्र्याहून निसटले. या सर्व ३ महिन्याच्या कालावधीमध्ये कैदेत असताना महाराजांनी आपल्या सोबत असणारे सर्व सरदार (ठराविक सोडून) पुन्हा स्वराज्यात पाठवले, हे इतर पुराव्यानिशी आपल्याला समजते. जर असे पाऊल शिवाजी महाराजांनी उचलले असेल तर त्यांनी हीरोजी फर्जंद यास विचारलेला प्रश्न – माझे सारथ्य कोण करील? हा प्रश्नच गैरलागु होत नाही का ?
महाराजांच्या वरील मुद्द्यास उत्तर देताना हीरोजी म्हणतो ‘साहेब जे समयी आदन्या करेल ते समयीं हीरोजी फर्जंद व मेदारी मेहतर फरास हजर होउं’
यानंतर हकिकतीत येणारा जो उल्लेख आहे तिथे
दूसरी शंका उपस्थित होते. तो उल्लेख काय आहे ते
आपण पाहुया.
“…हीरोजी महाराजांच्या जागी निजला होता. बाहेरील
दरोग्याने आत विचारले (मदारिस) महाराज काय करितात यावर त्याला मदारिने उत्तर दिले राजियाचे जीवास समाधान वाटत नाही. थोड्या वेळाने दरोगा मंडळी आत आली, त्यांनी हीरोजीच्या तोंडावर असलेला पदर काढला तो महाराज नव्हे हीरोजी निघाला. मग त्यास आणि मदारिस पकडून औरंगजेबासमोर नेले. मग औरंगजेबाने हीरोजीस विचारले महाराज़ कुठे आहेत? हीरोजीने ते आपल्या देशी गेल्याचे सांगितले. यावर औरंगजेबाने हीरोजीची गर्दन मारण्याचा हुकुम
केला (शिक्षा फ़क्त हीरोजीस मदारिस काहीच नाही?) यावर हीरोजी औरंगजेबास म्हणाला सुखरूप शिरच्छेद करावा हा जीव महाराजांवर ओवाळून टाकला आहे. याहून हास्यास्पद उल्लेख तर पुढें आहे – औरंगजेब हीरोजीस म्हणाला ‘तु इमानी चाकर आहेस मी मेहरबान झालो आहे माग तूला काय मागायचे?’
यावर हीरोजी औरंगजेबास म्हणतो – ‘मदारिस आणि मला सोडून द्यावे’, आणि औरंगजेबाने दोघांना सोडून दिले (कोण विश्वास ठेवेल ह्यावर?) सर्वात महत्वाचे म्हणजे हीरोजी पकडले गेले ही नवीनच माहीती अभ्यासकांना मिळते ह्या दिव्य साधनातून!!!
इतिहास साक्षीदार आहे शिवाजी महाराजांनी ज़ी फजिती औरंगजेबाची केली त्याची सल त्याच्या मनात कायमची राहिली. महाराज निसटले ही बातमी समजताच फौलादख़ान याने शोध मोहीम सुरु केलीँ. यात पकडले गेलेले रघुनाथपंत कोरडे, त्र्यंबकपंत डबीर, कविंद्र परमानंद यांचे उल्लेख
आपल्यालाला अस्सल साधनांमधे मिळतात, पण हीरोजी पकडले गेले असा उल्लेख कुठेच मिळत नाही. त्यामुळे हि हकीकत किती विश्वासहार्य आहे हे वाचकानींच ठरवावे.
याच हकीकतिची विश्वासहर्ता अजुन डळमळीत होते
ती पुढील उल्लेखावरून -
“…दोघेजण (हीरोजी आणि मदारी) काही दिवसांनी रायगडास आले. (रायगड ?? महाराज राजगडास परत आले याची नोंद जेधे शकावली मध्ये आहे) यानंतर या हकीकतीमध्ये हीरोजीला रायगडाची किल्लेदारी दिल्याचा उल्लेख आहे (हे कसे काय शक्य आहे?? स्वत: शिवाजी महाराजांचे वास्तव्य रायगडास १६७२ पासून होते तर
हीरोजीला किल्लेदारी देण्याचा प्रश्नच येतो कुठे??) नंतर मदारीस पण पोषाख वस्त्रे आणि हक्क वंश परंपरा करून दिला (म्हणजे काय दिले? वतन दिले? जमीन दिली?) पण कुठे? याची काही माहिती मिळत नाही. याउपर
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांसोबत
मदारीचा मुलगा सादुल्ला होता असे म्हटले आहे (मग
मदारीचा मृत्यु कसा झाला? कुठे झाला? तो आग्र्यावरून त्याच्या कुटुंबासोबत महाराष्ट्रात आला होता का? त्याचा मुलगा सादुल्ला खरोखर होता तर आज पर्यँत संभाजी महाराजांवर लिहिलेल्या चरित्रामधे या सादुल्लाचा साधा नाममात्र उल्लेख देखील नाही. याला काय म्हणावे?)
वरील सर्व उल्लेखामधील माहितीचा घटनाक्रम पाहता कित्येक मुद्दे हे विश्वासनीय नाहीत. कुठलाच संदर्भ जुळत नाही, यावरून ही हकीकत कशी विश्वासनीय मानावी हा एक मोठा गहन प्रश्न आहे.
कल्याणदास आणि परकालदास यांचा पत्रसारसंग्रह हा अभ्यासकांसाठी उपलब्ध आहे. (Shivaji Visit To Aurangjib At Agra) असे या पुस्तकाचे नाव आहे. या अस्सल संदर्भात देखील मदारी मेहतर असे नाव मिळत नाही. या संबधीचा अभ्यास करत असताना काही शिवचरित्रामध्ये (कादंबरी नव्हे) कल्याणदास आणि परकालदास यांच्या पत्रांचा संदर्भ आहे असे निदर्शनास आले. संबधित पत्र तपासले असता त्यामधे देखील मदारी मेहतर हे नाव मिळाले नाही. संबधित पत्राचा संदर्भ – Shivaji Visit To Aurangjib At Agra – Letter no – 33 असा दिलेला आहे.
वरील सर्व मुद्दे हे उपलब्ध पुराव्यांवर झालें.
आता वर्षानुवषॅ चालत आलेली दंतकथा पाहुयात- यामधे अग्रक्रमांक लागतो तो म्हणजे सद्यस्थितीमध्ये रायगड किल्ल्यावर महाद्वाराजवळ एक ठिकाण दाखवले जाते त्यास मशिद मोर्चा किंवा मदारी मेहतर मोर्चा असे म्हटले जाते त्याचा. मुळत:च हे ठिकाण कधी निर्माण झालें
याबद्दल आजपर्यंत कोणीही काहीही सांगितलेले नाही.
शिवाजी महाराजांना धर्म निरपेक्ष (Secular) दाखवताना काही मंडळी सूचकपणे मदारी मेहतरच्या स्मरणार्थ मशिद मोर्चा बांधला असे सांगतात. हा मुद्दा जरी तात्विक दृष्टया मान्य केला तर मग वरती म्हटल्या प्रमाणे मदारीचा मृत्यू कधी झाला? आणि महाराजांनी त्याच्या स्मरणार्थ बांधला असेल तर मग मदारीचा मृत्यु हा १६८० च्या अगोदर ( महाराजांच्या निधनाआधी) झाला का? याचे उत्तर कोण देणार?
स्वराज्याचे बांधकाम व्यवस्थापक हीरोजी इंदुलकर
यांना शिवाजी महाराजांनी हे बांधकाम करण्याचे आदेश
दिले होते का? राज्याभिषेकवेळी असणारे रायगडाचे वर्णन उपलब्ध आहे त्यात पण असे काही ठिकाण होते असा उल्लेख मिळत नाही.
शिवचरित्राच्या सर्वात जवळचा असणारा संदर्भ म्हणजे ‘सभासद बखर‘ यामधे आलेला उल्लेख पाहुया -
‘आपला साज सर्व उतरून हीरोजी फरजंद यास घालून
आपले पलंगावरी निजवले, हात मात्र उघडा बाहेर दिसू
दीला आणि शेला पांघरला व एक पोरगा रगङावयास
ठेवला.’ - इथे उल्लेख एक पोरगा असा केला आहे.
कृष्णाजी अनंत सभासद हे स्वतः राजीभिषेकावेळी हजर होते. जर असे मशीद/मदारी मेहतर मोर्चा नामक कपोलकल्पित ठिकाण तेथे असेल, तर त्यांनी त्याचा उल्लेख नक्की केला नसता?
मदारी मेहतर या नावाचा कुठलाही अस्सल पुरावा हा मराठी साधनांत तर सोडाच पण मुघल – राजस्थानी साधनांमधे देखील मिळत नाही.याची दूसरी बाजु जर आपण पाहिली तर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६८९ ते १७३३ या काळा पर्यंत रायगडावर यावनी राज्य होते.
या काळामधे अशी काही ठिकाण रायगडावर अस्तित्वात आली का यांचा शोध घेणे क्रमप्राप्त ठरेल.
सारांश मदारी मेहतर असे नाव असणारा एक इसम होता हे दाखवणारे एकही समकालीन साधन उपलब्ध नाही . एकंदरच मदारी मेहतर हे प्रकरण इतिहासात दंतकथा कश्या निर्माण केल्या जातात ह्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे!!!
|| लेखन सीमा ||
विशाल खुळे – marathahistory.com |
Email : padmadurg@gmail.com
॥www.dasbodh.com॥
टीप- प्रस्तुत लेखात तत्कालिन ऐतिहासिक साधनांचा उल्लेख आणि संदर्भ दिलेला आहे. त्यामुळे तथाकथित "खर्या इतिहासकारांनी" तोंड उघडण्याआधी गृहपाठ करावा... अपमान झाल्यास संचालक जबाबदार नाहीत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा