१) शिवरायांचा मूळ इतिहास हा जास्तीत जास्त फारसी,उर्दू,मोडी भाषेत आहे. त्यामुळे कोणत्याही ब्रिगेडी इतिहासकाराला(?) मूळ इतिहासाचे आकलन होऊ शकत नाही.कारण त्यांना ह्या भाषा अवगत नाही.
२) ‘समर्थ रामदास,दादोजी कोंडदेव हे आदिलशहाचे हेर होते’,असे अनेक ब्रिगेडी लेखक लिहितात..पण वस्तुतः ह्या दाव्याला कुठलाही ऐतिहासिक संदर्भ अथवा पत्रव्यवहार उपलब्ध नाही.
३) ‘शिवरायांच्या सैन्यात ४०%-५०% मुस्लीम होते’, हि तर निव्वळ थाप आहे. सैन्य असल्याचे इतिहासात आढळत नाही.
४) समर्थ-शिवराय भेट कधी घडलीच नाही , अशी बोंब मारतात. पण दिवाकर गोसावींचे ऐतिहासिक पत्रव्यवहार,‘चित्रगुप्ता’ची जी बखर, ‘सप्तप्रकरणात्मक चरित्र’ , ‘शिवप्रताप’, ‘शिवदिग्विजय’, ‘मराठी साम्राज्याची छोटी बखर’ इत्यादी ऐतिहासिक ग्रंथांमध्ये समर्थ-शिवराय भेटीचे संदर्भ आहेत , हे सांगायला सगळे ब्रिगेडी जाणीवपूर्वक विसरतात.
५) ‘समर्थ रामदासांनीच देहूतील ब्राह्मणांकरवी तुकाराम महाराजांचा खून केला’, ह्या धादांत असत्याला आजतागायत कुठलाही पुरावा मिळालेला नाही .
६) ‘शिवाजी महाराज,संभाजी महाराज,राजाराम महाराज,शाहू महाराज,नामदेव महाराज यांच्यासह अनेक महापुरुषांचा खून ब्राह्मणांनी केला’, अश्या ब्रिगेडी अफवांना सुद्धा कुठलाही पुरावा नाही...अथवा असा कुठलाही इतिहासात कागद सापडत नाही.
७) ‘शिवरायांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी संभाजी महाराजांनी सगळ्या ब्राह्मण मंत्र्यांना ठार केले’, हा तर कोकाटेफेम विनोद आहे. ह्या गोष्टीला कोणताही ऐतिहासिक आधार नाही.
ब्रिगेडी,मूळनिवश्यांना आवाहन- तुम्ही जर ब्रिगेडी लिखित इतिहासाशी सहमत असाल,तर आम्हाला ऐतिहासिक पुरावे,संदर्भ,दस्तावेज दाखवा.
बुद्धांचा इतिहास सांगा बर जरा त्यांचे बुद्ध लेन्या देवात कसे रुपांतर झाले
उत्तर द्याहटवा