मंगळवार, ११ डिसेंबर, २०१२

ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो ?



ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु
पाहतो ?
पण सध्या ह्या ओळींचा दुरुपयोग करून
शिवाजी महाराज ब्राह्मण
विरोधी होते
असा आरडा ओरडा केला जातोय. जर ते
ब्राह्मण विरोधी असते तर
त्यांनी त्यांच्या अष्टप्रधानात
आणि कार्यात ब्राह्मणांना स्थान दिले
असते का? स्वतः:ची वाक्ये
राजांच्या तोंडात कोंबून ब्रिगेडी लोक
अप्रत्यक्षपणे नव्हे तर आता थेट
प्रत्यक्षपणे राजांचा अपमान करीत
आहेत... जे लोक राजांबरोबर फक्त
राजकारणात नाही तर युद्धात देखील
खांद्याला खांदा लावून लढले
त्यांच्याविरुद्ध
हा मुर्खासारखा अपप्रचार सुरू
केला आहे. हे थेट
राजांच्या राज्यकार्याचा आणि
युद्धनितीचा अपमानच आहे.
ह्याचा निषेध करावा तितका कमीच.
'शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण?' हे
पुस्तक जेंव्हा माझ्या वाचनात आले
तेंव्हा त्यावरील मुखपृष्ठ (शिवाजीराजे
कृष्णाजी भास्करला मारताना) आणि
'ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु
पाहतो' या खालील ओळींनी विचारचक्र
सुरू केले. राजांनी हे एका पत्रात लिहिले
आहे खरे पण ते कृष्णाजी भास्करला नव्हे.
कुठल्याही एका जातीची मक्तेदारी
समाजावर नसून हे श्रींचे राज्य
अशी धारणा राजांची होती. हे वाक्य
राजांनी ज्या पत्रात वापरले आहे ते
संपूर्ण पत्र मी येथे देत आहे. ह्यावरून
समजून येईल की चुकीचे वाक्य
चुकीच्या ठिकाणी वापरून
लोकांची कशी दिशाभूल केली जात आहे...
शिवाजी महाराजांनी मुरुड-
जंजिरा समोर कांसा उर्फ़ पद्मदुर्ग
उभा करून सिद्दीला थेट आवाहन दिले
होते. त्या जलदुर्गाचे काम लवकरात
लवकर व्हावे म्हणुन
प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक
याला आरमारास रसद पोचवायचे काम
दिले होते. या कामात हयगय
केल्याबद्दल शिवरायांनी १८
जानेवारी १६७५
रोजी जिवाजी विनायक याला कडक
शब्दात ताकिद देणारे पत्र लिहिले.
त्यात ते म्हणतात,"ब्राह्मण म्हणुन कोण
मुलाहिजा धरु पाहतो?"
***************************
***************************
**************************
मशहुरुल हजरत
राजश्री जिवाजी विनायक सुभेदार व
कारकून सुभे मामले
प्रभावळी प्रती राजश्री शिवाजी राजे
दंडवत. सुहुरसन खमस सबैर व अलफ.
दौलतखान व दरिया सारंग यांसी ऐवज
व गल्ला राजश्री मोरोपंत पेशवे
यांणी वराता सुभे मजकुरावरी दिधल्या.
त्यांस तुम्ही काही पावविले
नाही म्हणोन कळो आले. त्यावरून अजब
वाटले की ऐसे नादान थोडे असतील!
तुम्हास समजले असेल की याला ऐवज
कोठेतरी देवविला पाहिजे. तो न
पावविता ऐवज खजाना रसद
पाठीविलीया माजरा होईल म्हणत
असाल. तरी पद्मदुर्ग वसवून
राजपुरीच्या उरावर
दुसरी राजपुरी केली आहे. त्याची मदत
व्हावी. पाणी फाटी आदि करून सामान
पावावे. या कामास आरमार बेगीने
पावावे. ते होत नाही तर पद्मदुर्ग
हबशी फौजा चौफेर जेर करीत असतील.
आणि तुम्ही ऐवज न पाठवून आरमार
खोळंबून पाडाल.
एवढी हरामखोरी तुम्ही कराल
आणि रसद पाठवून मजरा करू म्हणाल.
त्यावरी साहेब (शिवाजी राजे)
रीझतील की काय? ही गोष्ट
घडायची तरी होय, न काळे
की हबशियांनी काही देऊन आपले चाकर
तुम्हास केले असतील!
त्याकरिता ऐसी बुद्धी केली असेल!
तरी ऐश्या चाकरास ठिकेठिक
केली पाहिजेत. ब्राह्मण म्हणुन कोण
मुलाहिजा धरु पाहतो?
या उपरी त्याला ऐवज व
गल्ला राजश्री मोरोपंत देविला असे
तो देवितील. तो खजाना रसद
पाविलीयाहून अधिक तेणेप्रमाणे
आदा करणे की जे तुमची फिर्याद न करीत
व त्यांचे पोटास पावून आरमार घेऊन
पद्मदुर्गाच्या मदतीस राहात ते करणे.
या उपरी बोभाट
आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार
नाही, गनिमाचे चाकर गनीम जालेस ऐसे
जाणून बरा नतिजा तुम्हाला पावेल.
ताकीद असे.
रवाना छ २ जिल्काद.
***************************
***************************
**************************
तर हे १८ जानेवारी १६७५
रोजी लिहिलेले पत्र १६ वर्षे
आधी घडलेल्या 'कृष्णाजी भास्कर'
बरोबर जोडून अपप्रचार आणि गैरसमज
पसरविला जात आहे... हे आपण
अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणार
आहोत का???

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा