शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१२

*** भले तर देऊ कासेची लंगोटी !! नाठाळाचे माथी हाणु काठी !! ***




वाईस येताना अफझल 'खानांनी' तुळजापूरच्या देवीची विटंबना केली असा उल्लेख आहे तो चुकीचा आहे. कारण विजापुराहून वाईस येताना पंढरपूर लागते, तुळजापूर लागत नाही. तसेच अफझल खानाबरोबर मातब्बर मराठा सरदार असल्यामुळे मूर्तीची विटंबना होऊ शकेल असे वाटत नाही. - संदर्भ : "महापुरुष छत्रपती शिवाजी" बिग्रेडी लेखक - सय्यद अमीन

या बिग्रेडी हास्यास्पद ‘विकारवंतांच्या विकाराचे’ आम्ही मोजक्या शब्दांत खंडण केले असले तरी कितीही झाले तरी कुत्र्याचे शेपुट वाकडे ते वाकडेच तसेच बिग्रेडी तो वैचारीक आंधळा….. म्हणुन बिग्रेडी हे खंडण मान्य करतील अशी तिळमात्र आशा नाही.


सबब आम्ही अशा कोणावरही डोळे झाकुन विश्वास ठेवणा-या बिग्रेडीं लहाण मुलांसाठी त्यांच्या लाडक्या इंद्रजीत सावंत वकिलांच्या पुस्तकातला संदर्भ देत आहोत.


विजापुरहुन निघाल्यानंतर अफझल खानाने शिवरायांविरुद्ध अनेक कारस्थाने करण्यास सुरुवात केली. अफझल खानाने भोसल्यांची कुलदेवता आणि मराठ्यांचे आराध्य दैवत तुळजापुरच्या तुळजा भवानीचा अपमान केला. पंढरपुरचा विठोबाही त्याच्या भयाने लपवुन ठेवावा लागला. इतकेच नव्हे तर कोल्हापुरच्या अंबाबाईलाही आपली जागा सोडुन लपुन रहावे लागले.

( संदर्भ – अफझलखानाच्या भीतीने मंदिरातुन काढुन लपवलेल्या अंबाबाईच्या मुर्तीची स्थापना पुढे शिवरायांचे नातु करवीरकर छत्रपती संभाजी महाराजांनी इ.स. १७१७ मध्ये केली. – श्री. राजा शिवछत्रपती, पॄ. ९०७ )


या सर्व गोष्टी करण्यामागे अफझलखानाचे युद्धतंत्र होते. मराठ्यांच्या कुलदेवतांवर घाव घालुन त्याला शिवरायांच्या बाजुने लढणा-या सरदारांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण करायचे होते. शक्य झाल्यास शिवरायांना जावळीच्या दुर्गम प्रदेशातुन बाहेर काढुन मैदानात आणावयाचे होते. पण शिवरायांनी खानाच्या अशा कॄत्यांमुळे चिडुन जाऊन हाराकिरी ( आत्मनाश करुन घेणे ) केली नाही. त्यानी ठरवले एक मंदीर तुटले तर दुसरे बांधु, पण त्यासाठी आपण सुरक्षित राहिले पाहिजे.



--- पृष्ट क्रमांक – ४६ व ४७.

प्रतापगडची जीवनगाथा.

लेखक – इंद्रजीत सावंत.


*******तरी बिग्रेडी बालकानी आम्हा वडीलधा-यांकडुन दिलेला हा आहेर गोड मानुन घ्यावा.*******


*******सोबत बोनस म्हणुन तुमच्या लाडक्या इंद्रजीत सावंत वकिलांच्या वर उल्लेख केलेल्या पुस्तकामधील पाने जोड्ली आहेत.*******

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा