गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१३

।। स्वातंत्र्याची प्रतिष्ठापणा ।।

छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदूपातशाहीचा पाया घातला. रयतेचे स्वराज्य निर्माण केले. अखंड भारत वर्षामध्ये क्रांतीची ज्योत पेटवली. शिवरायांनी कशाच्या बळावरती हे स्वराज्य, स्वतंत्र साध्य केले? तलवारीच्या ? नाही ! ती तलवार पकडणाऱ्या बाहूंच्या बळावर अशक्यप्राय ते शक्य करून दाखवले. पण ते बल त्या बाहूंमध्ये आले कुठून? हृदयामधून . प्रेमाशिवाय माणसे एक होणार नाहीत आणि माणसे एकत्र आल्याशिवाय समाज निर्माण होणार नाही. जर समाजच नसेल तर धर्माचे कार्य काय राहते? शिवरायांनी हे बरोबर ओळखले होते. प्रेम व जिव्हाळा हे राजांच्या धर्मसंस्थापनेमधील प्रमुख सूत्र होते. " ज्ञानेश्वर माऊलीने पाया रचला, तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला आणि या भागवत धर्माच्या मंदिरात स्वातंत्रदेवतेची प्रतिष्ठापना केली ती युगपुरुष शिवाजी महाराजानी." स्वराज्य निर्मिती प्रेमाच्या अधिष्ठानावर झाली होती. द्वेषाच्या नव्हे. याउलट सुलतानी सत्ता व फिरंगी सत्ता ही द्वेषावर आधारित होती. भायावार आधारित होती.

शिस्त नसेल तर ते स्वराज्य कसले. सुलतानी आमदनी मध्ये रयत बेशिस्त गुलामी विचारसरणीने वाढलेली होती, परावलंबी झाली होती. ते स्वयंप्रेरीत असे शासन नव्हते. जुलूम, जबरदस्ती, भय यांचा अमल होता, राजांनी सर्वप्रथम राज्याला शिस्तीचे धडे दिले. कायदे कडक केले. माता भगिनी यांच्या शील रक्षणासाठी स्वराज्याची उभारणी झाली होती. सैनिकांनी कठोर शिस्तपालन करावे लागे. प्रेजेला उपद्रव होता कामा नये. निष्काळजीपणा चालणार नाही. रयतेचा भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये. उंदीर वात पळवून नेईल इतके बारीक नियोजन राजानी राबवले.होते. युद्धावर जाताना बाई, बटीक ठेवण्यास सक्त मनाई होती. जो कुणी उल्लघन करेल त्याची गर्दन मारली जात असे. हि शिस्त डोळे वटारून आलेली नसे तर प्रबोधन, सामंजस्य, शिक्षणाच्या सहाय्याने शिस्तीचे महत्व पटवून दिले जात असे. स्वराज्याची प्रजा शहाणीच हवी. गडाचे दर्वजी ठराविक वेळी बंद केले जात. केवळ राजांच्या परवानगीनेच ते उघडले जात. हिरकणीची कथा आपणास ठाऊक आहेच.

स्वराज्याला परकीयांचा जसा धोका होता तसाच स्वकीय म्हणवणाऱ्या काही लोभी लोकांचाही होता. शिवरायांनी खंडोजी खोपडयाचा एक हात आणि एक पाय कलम करण्याची शिक्षा दिली. त्यामागील हेतू हाच होता कि स्वराज्य द्रोहांवर वचक बसावा. खंडोजीला शिक्षा देणे क्रमप्राप्तच होते, नाहीतर जनतेचा असा समज झाला असता की स्वराज्यात गुन्हे करून केवळ माफी मागितली तरी चालते. अशाने रयत बेशिस्त होण्याच्या धोका होता. सुलतानांनी मराठ्यात भांडणे लावण्याकरिता वतनाची शक्कल लढवली होती. वतन हा मादक पदार्थ. ज्याप्रमाणे दारू प्यायलेला मनुष्य सर्वात आधी आपल्या पत्नी, मुलाबाळांची धूळधाण उडवतो त्याचप्रमाणे हे वतनाची दारू ढोसलेले स्वकीय! स्वराज्याच्या नाशावर टपलेले त्याच्याभोवती घुटमळत असत. केल्व्ल नावापुरते ही वतनदारी पद्धत स्वराज्यातून काढून टाकली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा