शिवरायांनी धर्मसंस्थापनेचे महान कार्य तडीस नेले. हिंदूस्थानाला आदर्श
युद्धनितीची देण दिली. महाराजांनी सत्य व अहिंसा यांची पुर्न:प्रतिष्टापना
केली. दुर्देवाने राजपुताना ह्या गोष्टी साध्य करता आल्या नाहीत.
मिर्झाराजेंनी शिवरायांसोबत हात मिळवणी केली असती तर? पण ६० वर्षाच्या
मिर्झा राजेना जे जमले नाही ते त्यांच्या हाताखाली सैन्यात असणारयाछत्रसाल
ह्या वीस वर्षाच्या युवकाला कळले छत्रसालाने छत्रपतींचा वसा उचलला. महाराजा
छत्रसाल म्हणजे बुंदेलखंडाचे व हिंदूस्थानाचे भूषण म्हणून त्यांचे नाव आपण
आजही आदराने घेतो. मिर्झा राजांच्या वाट्याला हे भाग्य आले नाही.
मिर्झाराजे खरोखरच पराक्रमी, शूर, धाडसी, मुत्सदी होते पण त्यांच्या गुणाचा
हिंदूस्थानला उपयोग होऊ शकला नाही. ह्याचे वाईट वाटते. राजपुताना महालाची
तीच अवस्था आहे.
राजस्थानातील राजपुतांचे महाल, हवेल्या अतिशय कमनीय सुंदर, नक्षीदार आहेत. जराही ओरखडे न उमटलेले व अजूनही जसेच्या तसे हे महाल पाहण्यासारखे लक्ष वेधून घेतात. उत्कृष्ट स्थापत्यशास्त्र व मनमोहक वास्तु वास्तुशास्त्रांची ती एक उतम पेशकश आहे. त्यासाठी त्यांचे कौतुक अवश्य करायला हवे. त्यांचे सोंदर्य डोळ्यांमद्ये साठवून ठेवावेसे वाटते. राजस्थानातील हे सुंदर ऐतिहासिक महाल पाहून कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. दक्षिणेमध्येही आपापल्या वास्तुश्त्राचे अदभूत नमुने पाहायला मिळतात. साहजिकच महाराष्ट्रातील नागरिकांना असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे की आपल्याकडे त्यांच्यासारखे प्रचंड महाल हवेल्या का? बांधल्या गेल्या नाहीत? मराठ्यांना ती कला अवगत नव्हती काय? आपल्याकडे ही हवेली श्रीमंती का बघायला मिळत नाही? याचे कारण म्हणजे निव्वळ बाह्य सोंदर्य न्याहाळण्याच्या ओघात काही अंतर्गत गुड रहस्याकडे आपले लक्ष म्हणावे तितके जात नाही.
जेव्हा कधी मराठांच्या काळ्या - कभिन्न, ओबडधोबड किल्ल्यांशी राजपूतांच्या महालांशी तुलना केली जाते तेव्हा काही गोष्टी ह्या स्पष्टपणे मांडाव्याच लागतात. ज्याप्रमाणे शरीरावर सोन्याचे दागिने, हिरे- माणकांची आभुषणे घातलेला एखादा दुर्बल मनुष्य गुंडांच्या तावडीत सापडल्यावर त्याची काय गत होईल? त्याला आपली श्रीमंती म्हणजे शाप वाटू लागेल त्याचप्रमाणे अंगी जर शोर्य नसेल तर त्या टोलेजंगी वाडे, सोन्या - रुप्याला, सौंदर्याला 'सुरतेला' काय महत्व आहे. इनायतखानाच्या सुरतेसारखीच त्यांची अवस्था होईल. पराक्रमशिवाय सौंदर्य हा शाप ठरवतो असे म्हणतात.
शिवाजी महाराज हे इतिहासाचे सूक्ष्म अवलोकन करीत असत. सोमनाथाचे मंदिर गजनीच्या सुलतानचे तब्बल सहा वेळा लुटले होते. म्हणजे हिंदूची धर्मभावना किती गाफील असावी याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. सहा वेळा ते सोमनाथचे मंदिर हिऱ्या माणकांनी गढवण्यात गुंग होऊन गेले पण त्याचा संरक्षणास त्यांना वेळ मिळाला नाही. आपला सगळा पराक्रम हिऱ्या माणकांच्या आच्छादनाखाली त्यांनी झाकून ठेवला होता. परमेश्वर त्यांना समजला नव्हता. इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा होत राहिली. पुढे यादव साम्राज्य आले. रामदेवरायानेही तीच चूक पुन्हा केली. पराक्रम लोप पावला आणि कपाळी गुलामगिरी आली. हेमाडपंताने सुबक देवळे उभारली होती. त्याच्या धडाधड मशिदी होऊ लागल्या. कबरींचे पीक आले.
महाराज ह्या सर्वांचे सिंहावलोकन करीत होते. महाराज संपत्तीचे मानसशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र उत्तमरित्या जाणत होते. महाराजानी ओळखले "प्रराकाम हा पुरुषांचा आणि लज्जा हा स्त्रियांचा दागिना आहे." स्वराज्याला त्याचीच गरज आहे दुसरी कशाची नाही. महाराजांनी स्वराज्याचे धन हे दुर्गबांधणीसाठी, आपले सैन्यदल सुसज्ज करण्यासाठी, प्रजेचे, सैनिकांचे व त्यांच्या कुटुंबियांचे पालन, देवा-धर्माचे रक्षण यामध्ये गुंतवले होते. राजांनी पोकळ डामडौल, दिखाऊगिरी पोसली नाही. जीवाभावाची माणसे हे महाराजांचे प्रमुख भांडवल होते.राजांनी हे जिवंत भांडवल स्वराज्याच्या प्राणरक्षणासाठी वापरले. एकीकडे राजपूत लोक मुघलांची गुलामगिरी करण्यात, आपले महाल सांभाळण्यात गुंतले होते. तर इकडे महाराज स्वातंत्रदेवताची उपासना करत होते. रयतेचे सुख पहात होते. मोठमोठी देवळे व महाल बांधून सुद्धा जी स्वतंत्रदेवता राजपुताना प्रसन्न झाली नाही ती शिवरायांना झाली.
राजपुतांनी आपले महाल जसेच्या तसे टिकवले. पण त्यासाठी त्यांना गुलामीची खंडणी मुघलांना द्यावी लागली. याउलट मराठ्यांनी दिखाऊ सौंदर्याला कधीच किंमत दिली नाही. संरक्षण व स्वाभिमान हे त्यांचे मुख्य सूत्र होते. मराठ्यांना आपल्या सुंदर वाड्यापेक्षा स्वराज्यातील माता-भगिनीचे शील-रक्षण अधिक प्रिय होते, त्यासाठी ते आक्रमकांशी झुंजले.
लढाईत सौर्य गाजवून आलेल्या सैनिकांचे सौंदर्य कशात आहे?
आपल्या मातृभूमीचे स्वातंत्र टिकवण्यासाठी त्याने शरीरवर अनेक घाव झेललेले असतात. त्या सर्वांच्या खुणा म्हणजे स्वातंत्र देवतेने त्यांना केलेले कुंकुम- तिलक होय.त्या जखमा म्हणजे स्वातंत्र देवतेचे सौभाग्य होय. सौभाग्याची तुलना हिरे, मोती, व पाचू इत्यादीने केली जात नाही. स्वातंत्रदेवता बाह्य सौंदर्यावर फिदा होत नाही. पुरुषार्थाला ती जीवेभावे ओवाळते. महाराष्ट्राचे लढवय्ये दुर्ग अजूनही त्या शौर्याच्या खुणा, स्वातंत्रलढयाचा इतिहास अंगावर बाळगून आहेत. ह्या दुर्गांकडे पहिले की मन अभिमानाने भरून येते. स्वातंत्रदेवतेने दिवसरात्र एक करून घडवलेली ती शिल्पे आहेत. आपल्या रक्त व अश्रूंचा आभिषेक तिने त्या शिल्पांवर केला आहे. स्वराज्याची सुगंधी फुले त्यावर उधळलेली आहेत. आणि त्या अप्रतिम शिल्पाला तिने मनोभावे वंदन केले आहे.
महाराष्टाचे दुर्ग म्हणजे काळे पाषाण आणि दगडगोटे नाहीत. हे दुर्ग स्वराज्याच्या शिल्पाराने (शिवरायाने) घडवलेली स्वराजाची महान शिल्पे आहेत. हिंदूस्थानचे पुन:रुज्जीवन महाराष्ट्रच्या या ओबडधोबड दुर्गानीच केले आहेत. जर महाराष्ट्र परकीयाविरुद्ध लढला नसता, तर राजस्थानातील महालाच काय! परंतु हिंदुस्थान राष्ट्रही आपल्याला बघायला मिळाले नसते. महाराष्ट्राच्या दुर्गानी राष्ट्राचे संरक्षण व नव-निर्मितीमध्ये फार मोलाची भूमिका बजावली. ते भाग्य राजस्थानातील सुंदर महालाच्या नशिबी आले नाही.
म्हणूनच आज महाराष्टाचे दुर्ग म्हणजे भारतमातेच्या मुकुटातील गौरवमणी होत. त्यांची तुलना राजपुतांच्या महालांशी होऊ शकत नाही. रत्नजडीत म्यानामाद्ये पडून राहिलेल्या सोनेरी तलवारीसारखेच राजपुतांचे महाल आहेत. त्यांनी स्वातंत्र्याची हवा कधी अनुभवलीच नाही. राजपुतांचे महाल म्हणजे मूर्तिमंत शापित सौंदर्य आहे.
इ. स. १८१८ साली इंग्रजांनी भारतावर ताबा मिळवल्यावर सर्वात आधी कोणते काम केले असेल तर महाराष्ट्राच्या दुर्गाची नासधूस; कारण त्यांना ठाऊक होते की हे केवळ दगड - मातीचे ढिगारे नाहीत. ही मराठ्याची स्फूर्तीस्थाने आहेत. याउलट राजपुतांचे महाल अगदी तसेच शाबूत राहिले कारण इंग्रजांना हेही ठाऊक होते की हिंदूस्थानच्या जनतेला गाढ निद्रेत नेण्यासाठी हे महाल उपयोगी पडतील. अजूनही महाराष्ट्रचे दुर्ग जनतेची हि गाढ निद्रा संपण्याची वाट पहात मोठ्या आशेने उभे आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा