शनिवार, २१ डिसेंबर, २०१३

संभाजी महाराज

आज काल एक नवीन फॅड आलय बाजारात. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अथवा मराठेशाही मधील काही किस्से सांगताना मुद्दाम ब्राह्मणांचा अपमान केला जातो. हे मी गेले कित्येक महिने पाहत आलोय. आम्ही जातीयवाद करत नाही वगैरे बोलणारे बरेच लोकं आहेत फेसबुकवर पण संधी मिळताच छुपे टोमणे मारणे सोडत नाहीत! "संभाजी महाराज द ग्रेट" वगैरे नावाने पेज चालवायचं अन संभाजी महाराजांनी आयुष्यात केला नाही तो जातीयवाद करायचा- हा ह्यांचा धंदा! 
ब्राह्मणांना ऐतखाऊ, वाईट, द्रोही, कपटी दाखवण्याचे ह्यांचे धंदे कोणत्या ठरला जातात ते पहा:

१. शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी मारला हे खरं. पण म्हणून तो द्रोही कसा? तो खानाची चाकरी करत होता! त्याने त्याच्या मालकाच्या शत्रूला मारायचा प्रयत्न केला! ह्याचाच अर्थ तो कर्तव्यनिष्ठ होता! सय्यद बंडाने देखील हेच केले! आणि खुद्द अफझल? त्याने तर घात केला, महाराजांना (अपेक्षित) मिठीत घेऊन मारण्याचा प्रयत्न - केवढा मोठा धोका केला त्याने. पण हे आज कालचे सळसळत्या रक्ताचे इतिहासवीर - खानाचे क्रौर्य, त्याचा हिंदू धर्म द्वेष - शहाजी महाराजांस केलेली अटक, संभाजी राजांस कपट करून मारलेले आठवत नाही! त्याच्या बद्दल एक चकार शब्द नाही! 

२. परवाच एक पोस्ट वाचली - संभाजी महाराजांवर. त्यात एक ओळ अशी होती - "शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यावर "जगलेले" पेशवे शिकवतात पण संभाजी महाराज नाही शिकवत". 

होय! आमचे संभाजी महाराज आहेतच शूर, पराक्रमी अत्यंत हुशार आणि उच्चशिक्षित - आणि म्हणून त्यांनी कधीच कुठल्याच जातीचा द्वेष केला नाही! लोकांना हे ठाऊक नाही संभाजी महाराजांना गणोजी शिर्के हाय त्यांच्या मेहुण्याने फितुरीने पकडून दिले - आता त्या शिर्केची जात काय होती? सांगू? तो पण मराठाच होता ना? पण आमच्यावर महराजांचे संस्कार आहेत. आम्ही जातीवरून माणसाची पारख करायला शिकलो नाही! बरं संभाजी महाराजांसोबत अखेर पर्यंत कोण होता? कवी कलश - तो देखील ब्राह्मण! पण तो तर स्वामीनिष्ठ होता! आता हे समीकरण कसे जुळवायचे? 

बरं पेशवे ऐतखाऊ तर मग त्यांनी कशाला राज्य विस्ताराचा घाट घातला? कशाला बाजीराव पेशव्यांनी अखंड हिंदुस्तान घोड्याच्या टापांखाली घातला? का भीमथडीची घोडी यमुनेचे पाणी पिऊ लागली आणि काही काळानंतर सिंधू नदीच पाणी पिउन आली? त्यांचा आदर्श कोण होतं ? अर्थात शिवाजी महाराज! पेश्य्वांचा दरारा १७६१ पर्यंत देशभर इतका प्रचंड होता पण एकदाही त्यांनी कधी फितुरी नाही केली, स्वतःच राज्य नाही स्थापलं किंवा छत्रपतींच्या आज्ञेबाहेर नाही गेले! ह्याला म्हणतात स्वामिनिष्ठा! 

३. महाराज गेले तेव्हा औरंगझेबाला किती दुःख झालं असं सांगणारा एक मेसेज फेसबुकवर सध्या शेअर केला जातोय. हा औरंग्या - स्वतःच्या बापाला मारला ह्याने, भावांची कत्तल करवली, कुराणाची खोटी शपथ खावून आपल्याला शरण आलेल्या लहान भावास दरबारात येण्या अगोदर मारेकरी घालून मारणारा हा नराधम! ह्याला महाराजांच्या मृत्युचं दुःख? आणि ह्याचं कौतुक होतंय सुफी संत म्हणून! आणि हे करतंय कोण? आपलीच लोकं! आणि संभाजी राजांना ब्राह्मणांनी मारल असा खोटा आरोप करत सुटलेत. "शिवाजी अंडरग्राउंड…" ह्या नाटकात सर्रास आरोप आहे हा! आणि हे नाटक सेन्सॉर वाले चालू देतात! आणि ह्या असल्या जातीयवादी शिवभक्तांना प्रोत्साहन द्यायला आहेतच सळसळत रक्त घेऊन उभे असलेले अर्धवट इतिहासकार!

असे बरेच खोटे आरोप आहेत. त्यांना हाणून पडणारे ऐतिहासिक पुरावे देखील आहेत. आणि आता प्रत्येक वेळी ते पुरावे देऊनच असल्या कुत्र्यांची तोंडे बंद केली पहिजेत. हि कुत्री भुंकायला लागली कि एकलव्यासारखे पुराव्याचे बाण सोडून त्यांची तोंडं बाणांनी भरून टाकली पाहिजेत! वेळचं वेळीच हे थांबलं पाहिजे आता! 

एक दीड शहाणा म्हणाला - "हा इतिहास आहे कोणाच्या भावना दुखावतील तर त्याला मी काही करू शकत नाही. "
इतिहासाचा अभ्यास करताना भावना बाजूला ठेवायच्या असतात हे मी तुला आज सांगतोय. जर मी आज इतिहास सांगू लागलो तर काही गोष्टी तुला झेपणार देखील नाहीत मित्रा! त्यामुळे खरा इतिहास वाच! फेसबुकवर ब्रीगडी लांडगे चेकाळले आहेत! त्यांची कोल्हेकुई ऐकू नकोस! 

हा इशारा आहे त्या सर्व जातीयवादी ब्रीगडी आणि त्यांच्या पिलावळीला! 
सावधान!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा