शनिवार, २१ डिसेंबर, २०१३

छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामी यांना लिहिलेलेपत्र.


!! श्री !!

श्री रघुपती 

श्री मारुती

श्रीसद्गुरुवर्य श्रीसकलतीर्थरूप श्रीकैवल्यधाम श्रीमहाराज श्रीस्वामी, स्वामींचे सेवेसी

चरणराज शिवाजीराजे यांनी चरणावर मस्तक ठेऊन विज्ञापना जे मजवर कृपा करून सनाथ केले.

आज्ञा केली कि तुमचा मुख्य धर्म राज्यसाधन करून धर्मस्थापना देवब्राम्हणाची सेवा प्रजेची पिडा दूर करून पाळण रक्षण करावे हे व्रत संपादून त्यात परमार्थ करावा. 

तुम्ही जे मनी धराल ते सिद्धीस पाववील त्याजवरून जो जो उद्योग केला व दुष्ट तुरुक लोकांचा नाश करावा. विपुल द्रव्य करुनू राज्यपरंपरा अक्षई चालेल ऐशी स्थळे दुर्घट 

करावी. ऐसे जे जे मनी धरिले ते ते स्वामींनी आशीर्वाद प्रतापे मनोरथ पूर्ण केले. याउपरी राज्य सर्व संपादिले ते चरणी अर्पण करून सर्वकाळ सेवा घडावी ऐसा विचार मनी 

आणिला तेव्हा आज्ञा जाहली कि तुम्हास पूर्वी धर्म सांगितले तेच करावेस तीच सेवा होय. ऐसे आज्ञापिले यावरून नीकटवास घडूनु वारंवार दर्शन घडावे श्रीची स्थापना 

कोठे तरी होऊन सांप्रदाय शिष्य व भक्ती दिगंत विस्तीर्ण घडावी ऐसी प्रार्थना केली तेही आसमंतात गीरीगव्हरी वास करून चाफळी श्रीची स्थापना करून सांप्रदाय शिष्य 

दिगंत विस्तीर्णता घडली त्यास चाफाळी श्रीची पूजा मोहोछाव ब्राह्मणभोजन अतिथी इमारत सर्व यथासांग घडावे. जेथे जेथे श्रीची मुर्तीस्थापणा जाहाली तेथे उछाव 

पूजा घडावी यास राज्य संपादिले. यातील ग्रामभूमी कोठे काय नेमावी ते आज्ञा व्हावी. तेव्हा आज्ञा जाहाली कि विशेष उपाधीचे कारण काय तथापि तुमचे मनी श्रीची 

सेवा घडावी. हा निश्चय जाहाला त्यास यथा अवकाश जेथे जे नेमावेसे वाटेल ते नेमावे व पुढे जसा सांप्रदायाचा व राज्याचा व वंशाचा विस्तार होईल तैसे करीत जावे. या 

प्रकारे आज्ञा जाहाली यावरून देशांतरी सांप्रदाय व श्रीची स्थापना जाहाल्या त्यास ग्रामभूमीची पत्रे करून पाठविली. श्रीसंनिध चाफळी एकशेएकवीस गाव व सर्वमान्य 

एकशेएकवीस गावी अकरा बिघेप्रमाणे भूमी व अकरा स्थळी श्रीची स्थापना जाहाली तेथे नैवेद्यपुजेस अकरा बिघेप्रमाणे नेमिले आहे. ती ऐसा संकल्प केला आहे तो सिद्धीस 

नेण्याविषयी विनंती केली तेव्हा संकल्प केला तो परंपरेने सेवटास न्याहावा ऐसी आज्ञा जाहाली त्यावरून सांप्रत गाऊ व भूमी नेमिले. 

यकून दरोबस्त सर्वमान्य गाऊ तेहतीस, व जमीन बिघे गाऊगना चारशे येकुणीस, कुरण येक व गल्ली खंडी एकशे एकवीस श्रीचे पूजा उछाहाबद्दल संकल्पातील सांप्रत 

नेमिले व उछाहाचे दिवसास व इमारतीस नक्ती ऐवज व धान्य समयाचे समयास प्रविष्ट करीन. येणे करोन अक्षई उच्छाहादी चालवण्याविषयी आज्ञा असावी. 

राज्याभिषेक ५ कालयुक्ताक्षी नाम संवत्सरे आश्विन शुद्ध १० दशमी.

बहुत काय लिहिणे. हे विज्ञापना. 

संदर्भ - चाफळची सनद.
श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडन

1 टिप्पणी:

  1. ही प्रकाशित चाफळची सनद खोटी बनावट आहे असं गजानन भास्कर मेहेंदळे गुरुजींनी पुराव्या निशी सांगितले आहे
    भारत इतिहास संशोधक मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष श्री मा भावे यांनी देखील सनद अस्सल नाही असं सांगितलं आहे
    तरी देखील आपन या चे समर्थन का करावे

    उत्तर द्याहटवा